शेतकऱ्यांना फार्महाऊस बांधणीसाठी ही बँक देणार कर्ज : Farmhouse Loan Scheme Maharashtra 2023

 

शेतकऱ्यांना फार्महाऊस बांधणीसाठी ही बँक देणार कर्ज : Farmhouse Loan Scheme Maharashtra 2023


Farmer Loan Scheme : शेतकरी मित्रांनो, शासनाकडून शेतकऱ्यांना शेतामध्ये साठवण्यासाठी निवारा उपलब्ध करून द्यावा, या अनुषंगाने महाडीबीटी पोर्टलवर अनेक योजना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. ज्यामध्ये पॅकहाऊस, कांदाचाळ, शेडनेट इत्यादीचा समावेश आहे.

फॉर्महाऊस लोन योजना

MahaDBT पोर्टल व्यतिरिक्तसुद्धा शेतकऱ्यांना बँकेकडून फार्म हाऊस बांधणीसाठी कर्ज (Loan) उपलब्ध करून दिलं जातं. याबद्दलची थोडक्यात माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

फार्म हाऊस लोन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्म हाऊस बांधणीसाठी जवळपास 50 लाखापर्यंत कर्ज (Loan) मंजूर केलं जाणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.

शेतामध्ये जागेवर फार्म हाऊस बांधणी केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतातील विविध कामासाठी लागणारे सामान, साहित्य, यंत्र इत्यादी फार्म हाऊसमध्ये साठवता येणार आहेत, तर चला शेतकरी मित्रांनो, पाहूयात यासाठी कागदपत्र कोणती लागतील ? पात्रता काय असेल आणि महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करावा लागेल ?

फॉर्म हाऊस कर्जासाठी पात्रता खालील प्रमाणे

  • वैयक्तिक शेतकरी किंवा गटसमूहाने शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात.
  • शेतकऱ्यांकडे कमीत कमी 2.5 एकर लागवडी योग्य बागायती जमीन असावी.
  • अर्जदार शेतकऱ्यांचा शेती व इतर पूरक व्यवसायातून चांगला उत्पन्न असावा.
  • बँकेमध्ये तुमचा कर्ज संदर्भातील व्यवहार सतत होत असेल, तर तुम्हाला कर्ज लवकर उपलब्ध करून दिले जाईल, जर तुम्ही नवीन कर्जदार असाल तर यासाठी मागील तीन वर्षाचा बँक व्यवहाराचा तपशील द्यावा लागेल.

इतर महत्वाच्या अटी

१) राज्याच्या कायद्यानुसार फार्म हाऊस बांधण्याची परवानगी घेण्यात यावी 

२) घराच्या बांधकामासाठी कृषी जमीन रूपांतरण सरकारच्या नेमून देण्यात आलेल्या निर्देश कलमानुसार आवश्यक आहे

 ३) जमिनीची मूल्यांकन पडताळणी संबंधित रजिस्टर ऑफिस मधून करून प्रमाणपत्र मिळवणे आवश्यक आहे

 ४) अर्जदारांनी केवायसी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे 

५) शेतकऱ्याला पुरेशी मिळकत, कर्ज हप्ता भरण्याची क्षमता असणे आवश्यक

अर्जदार वयोमर्यादा

अर्जदारांचे किमान वय 18 वर्ष पूर्ण असावे, तर जास्तीत जास्त 75 वर्ष असलेल्या शेतकऱ्यांना फार्म हाऊस कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.

अर्जासाठी आवश्यक कागदपत्र

  • शेतजमिनीचा ७/१२ चालू उतारा
  • ८ अ उतारा म्हणजे होल्डिंग प्रमाणपत्र
  • 6 डी अर्क्क फेरफार
  • हमीपत्र
  • बँकेचा पासबुक राष्ट्रीयकृत बँक असावी
  • चतुसीमा प्रमाणपत्र
  • बँक स्टेटमेंट
  • सहअर्जदार पगारधारक असल्यास ITR, पगार पत्रक इत्यादी

मित्रांनो तुम्ही जर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असाल, तर अर्ज करताना इतर आवश्यक कागदपत्रांची माहिती दर्शविली जाईल. जर ऑफलाईन पद्धतीने बँकेमध्ये अर्ज करत असल्यास बँकेतील कर्मचाऱ्यांमार्फत आवश्यक कागदपत्रांची माहिती तुम्हाला दिली जाईल.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथ क्लिक करा
फार्महाऊस कर्जाच्या पूर्ण माहितीसाठीयेथ क्लिक करा

Comments

Popular posts from this blog

Stand-Up India (SUI) scheme for financing SC/ST and/or Women Entrepreneurs स्टँड-अप इंडिया योजना

Vishwakarma Scheme गावकारागिरांना उभारी देणारी विश्वकर्मा योजना...!! कमी व्याजदरात मिळणार 3 लाख रुपयांचे कर्ज